संघटनेचा नेता हा डोळस असावा याच मूर्तिमंत उदाहरण म्हणजे कॉम सुरेंद्रजी पालव सर ! 2013 -2014 मध्ये जी PA ची भरती झाली त्यामधून अनेक उमेदवार कामावर रुजू झाले नाही व कालांतराने त्यांचा हक्क संपुष्टात आला. नेमकं या गोष्टीवर आपली संघटना व कॉम पालव सर जातीने लक्ष ठेऊन होते व त्यांनी लगेच प्रतीक्षा यादीवर असलेल्या उमेदवारांना संधी देण्यात यावी यासाठी मा. मुख्य पोस्टमास्तर जनरल यांच्याकडे आग्रह धरला व त्याचा पाठपुरावा सुरू केला. ते पत्र दिनांक 20.03.2018 च होत यागोदरही संधी मिळेल तेव्हा त्यांनी हा विषय चर्चिला व RCM च्या मिटींगला हा मुद्दा घेतला व अथक प्रयत्नानंतर हा मुद्दा परवा प्रशासनाकडून निकाली काढण्यात आला. यामध्ये जवळपास 221 नवीन PA आपल्या सर्कल ला मिळाले जे की मिळणं दुरापास्त होत .सातत्यानं संघटना कामगारांसाठी अशी भरीव कामे करीत असते फक्त आपण ती डोळस होऊन बघायला हवी, कॉम पालव सर आपण करीत असलेल्या निस्वार्थ कामाला लाल सलाम! संघटना ही फक्त संघटना नसून समाजसेवेच उत्तम साधन आहे हे आपण दाखवून दिले .आज 221 लोकांच्या घरातील लोकांना कायमस्वरूपी आपण उदरनिर्वाहाची सोय करून दिली ही गोष्ट भूषणावह आहे. व याबाबतचा पाठपुरावा म्हणून संघटनेचं पत्र मी खाली टाकत आहे .
सर्वांनी या गोष्टीचा प्रसार करून हे 221 उमेदवार आपले कसे होतील यासाठी प्रयत्न करा अशी कॉम पालव सर यांची इछा आहे.आपण काम केल्याचा पुरावा म्हणून हे पत्र प्रत्येकापर्यंत पोचवायलाच हवं कारण ही लोक आपल्याशी जोडल्या गेली तर संघटना आणखी बलाढ्य होईल.तरच या मेहनतीला अंतिम स्वरूप मिळेल.
"सर्वांस अन्नास लावणे आहे" हे छत्रपती शिवरायांच ब्रीद सत्यात उतरलं !
पुरावा म्हणून ते पत्र सोबत जोडत आहोत!
NFPE झिंदाबाद ! कॉम पालव झिंदाबाद!NFPE झिंदाबाद!