देशव्यापी लाक्षणिक संप २ सप्टेंबर २०१५
सर्व केंद्रीय कर्मचारी संघटनांचा एक दिवसाचा लाक्षणिक संप दि. २.९.२०१५ रोजी आयोजित केला गेला आहे. सरकारच्या कामगार विरोधी धोरणांना विरोध करण्यासाठी व शासन दरबारी दीर्घकाळ पडून असलेल्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी पुन्हा एकदा सर्व सरकारी कर्मचाऱ्यांच्या सामुहिक मागण्यासह टपाल विभागाच्या १२ सूत्री मागण्यांसाठी संपाची हाक देण्यात आली आहे. 
मागण्या 
१. सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी १. १.२०१५ पासून लागू करा व भविष्यात वेतन पुनर्रचना दर ५ वर्षांनी     करा. अंतरिम वाढ (IR) मंजूर करा व १००% महागाई भत्ता मूळ वेतनात विलीन करा. ग्रामीण डाक                 सेवकांना ७ व्या वेतन आयोगाच्या कार्यकक्षेत  अंतर्भूत करा. ६व्या वेतन आयोगातील सर्व त्रुटी  दूर करा. 
२. मेल मोटार सर्विस सहित सर्व केडरच्या "कॅडर रीस्ट्रक्चरिंग" प्रस्तावाची अंमलबजावणी करा. 
३. आर्बीट्रेशन अवार्ड्स  कार्यान्वित करा आणि ओव्हर टाईमचे दर वाढवा 
४. टपाल खात्याच्या खाजगीकरणाचा प्रस्ताव रद्ध करा. रेल्वे, विमा व सरंक्षण या सरकारी आस्थापानात्ल थेट      परकीय गुंतवणुकीचा प्रस्ताव मागे घ्या. 
५. नवीन जागा निर्माण करण्यावरील बंदी हटवा व सर्व रिक्त पदे भरा. 
६. PFRDA कायदा रद्ध करा व १.४.२००४  नंतर भरती झालेल्या कर्मचार्यांना जुनी पारंपारिक पेन्शन                    योजना लागु  करा. 
७. आउटसोर्सिंग, ठेकेदारी, सरकारी कार्यप्रणालीचे खाजगीकरण करण्याचे धोरण थांबवा. प्रिंटींग प्रेस स्टोअर       डेपो, स्टेशनरी विभाग, मेडीकल स्टोअर डेपो बंद करण्याचे प्रस्ताव मागे घ्या. रोजंदारी व कॅज्युअल                 कर्मचार्यांच्या सेवा नियमित करा. 
८. वाटाघाटी यंत्रणा जेसीएमचे पुनरुज्जीवन करा. 
९. अनुकंपा भरतीवरील ५ टक्क्यांचे बंधन दूर करा. 
१०. कामगार कायद्यातील कामगार अहिताच्या प्रस्तावित सुधारणा मागे घ्या. 
११. बोनसवरील अधिकतमतेची  सीमा काढून टाका. 
१२. केंद्रीय सरकारी कर्मचार्यांना त्यांच्या सेवाकाळात पाच प्रमोशन द्या. 
      तरी संपाच्या तयारीला लागा आणि आपली ताकद सरकारला दाखवा. आपला लढाऊ बाणा पुन्हा एकदा           दाखवून हा संप १०० % यशस्वी करा. 
लाल सलाम 
मंगेश परब 
सर्कल सेक्रेटरी