युनियनने काउंटरचे वाढलेले तास कमी करण्यासाठी पत्रव्यवहार केला तसेच तीन ते चार वेळा चीफ पोस्टमास्टर जनरल महाराष्ट्र सर्कल तसेच पोस्टमास्टर जनरल यांना भेटून सतत पाठपुरावा केला. यासाठी माझ्याबरोबर कॉ. सुरेंद्र पालव रीजनल सेक्रेटरी, कॉ. सुरेश सावंत फायनान्स सेक्रेटरी, कॉ. गुरुदत्त आळवे शाखा सचिव मुंबई जीपीओ कॉ. मजगावकर शाखा सचिव साउथ डिविजन हे उपस्थित होते.
आपल्याला कळविण्यात आनंद होत आहे की आपल्या ह्या प्रयत्नांना यश आलेले आहे. दिनांक २२-१२-२०१४ रोजी असिस्टंट डायरेक्टर (टेक्नॉलॉजी) यांनी काउंटरचे वाढीव तास कमी करण्या संदर्भात आॅर्डर काढलेली आहे. (TC/31-1/Project Arrow/Phase VIII/2013-14 dated 22-12-2014).
यासाठी फक्त आपल्या युनियनने पत्रव्यवहार केलेला होता.
मंगेश परब
सर्कल सचिव