१२-०२-२०१४ पासून ४८ तासांचा सुरु झालेला संप दि १३-०२-२०१४ रोजी समाप्त झाला.महाराष्ट्रात टपाल कर्मचार्यांनी तो १०० टक्के यशस्वी केला सर्व बहाद्दूर टपाल कर्मचाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन. पुढील पाऊल काय उचलावे या बाबत विचार करण्या साठी केंद्रीय समन्वय समितीची बैठक दि १८-०२-२०१४ रोजी दिल्लीला होत आहे. आचार संहिता लागू होण्या पूर्वी ७व्या वेतन आयोगाची कर्यकक्षा ठरवावी म्हणून सरकारवर राजकीय दबाव आणला जाणार आहे.