*महाराष्ट्र सर्कल कौन्सिल २०२०*
प्रिय कॉमरेड्स,
लाल सलाम
दिनांक १२/०१/२०२० व १३/०१/२०२० रोजी यवतमाळ येथे आयोजित सर्कल कौन्सिल मध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. मान्यवर अतिथी, सर्कल डेलिगेट्स, महिला कमिटी, डिविजनल डेलिगेट्स तथा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे.
मित्रांनो, सर्कल स्तरिय कार्यक्रमाचे आयोजन आम्ही पहिल्यांदाच करतोय. ही हिम्मत आम्ही केलिय, ते केवळ आपण सर्व आमच्या पाठीशी आहात व आम्हाला समजुन घेणारे आहात म्हणून.
आमत्रंण सर्वांना पाठवलंय पण संघटनेच्या विविध कमिट्या / विविध पदे या बाबत मला फारसी हुशारी व अनुभव नसल्याने कुणाला आमत्रंण मिळाले नसेल कुणाचे नाव सुटले अदेल तर तो माझा अजाणतेपणा समजावा व आपण हक्काने यावे. चुक झाली असल्यास लहान समजुन माफ करावे. 🙏
यवतमाळ जिल्ह्या हा तसा ऐतिहासिक नाही. जंगलाने व्यापलेला, आदिम व बंजारा बहुल भाग. मुळ येवती नावाचं छोटसं गाव पण थंड वातावरणाचं ठिकाण म्हणून इग्रंजांनी आपली जिल्हा कचेरी वणी वरुन येवती ला हलविली आणि येवतीचं हे माळ , यवतमाळ म्हणून नावारूपाला आलं.
स्वातंत्र्यसंग्राम, राजकारण,साहित्य या क्षेत्रात मात्र यवतमाळची वेगळी ओळख आहे.
प्रेक्षणीय म्हणाल तर येथील जंगल पण वेळ काढुन आपण जाऊ शकता येथुन 80 कि.मी. असलेल्या माहूर गडाला. साडेतीन शक्तीपिठापैकी एक. आई रेणुकामातेचं, दत्त प्रभुंच ठिकाण.
नृसिंह स्वामी सरस्वती गुरुमंदिर कारंजा लाड येथुन ८० कि.मि. तर ऐतिहासिक चिंतामणी कळंब -२२ कि. मि.
यवतमाळ ला आपण रेल्वेने येत असाल तर जवळचे स्टेशन धामणगाव.
अथवा बडनेरा (अमरावती) किंवा वर्धा येथूनही येउ शकाल
किवा बस किवा खासगी ट्रेव्हल्स ने मुंबईकर व पुणेकर डायरेक्ट यवतमाळ ला येउ जाउ शकतात. पुण्याहुन ११ तारखेला दुपारी ४ /५ ला बसलात तर सकाळी यवतमाळ ला पोहोचाल व येथुन पुणे मुंबई साठी सायंकाळी/ रात्रीला बऱ्याच ट्रेव्हल्स मिळतात. (Sleeper coach)
यवतमाळ बसस्थानकावर उतरल्यावर ऑटो ने आपण कार्यक्रमस्थळी येउ शकता.
आपला कार्यक्रम १२ व १३ जानेवारीला असल्याने १२ ला सकाळ च्या चहा नास्त्यापासुन पासुन सर्व व्यवस्था तथा निवास कार्यक्रमस्थळीच राहील. परंतु आपण ११ तारखेला ला येत असाल तर रात्री निवासाची व्यवस्था फक्त कार्यक्रमस्थळी होइल.
मंगल कार्यालय असल्याने निवास व्यवस्था तिथेच असेल. प्रत्येकाला वेगळी रुम नसली तरी एका रुम मध्ये ५ ते १० लोक झोपु शकतील अश्या प्रशस्त खोल्या आहेत.
येथे थंडी थोडी जास्त असल्याने सोबत स्वेटर व कानटोपी आणणे उत्तम.
तेव्हा लवकरच भेटुया
यवतमाळात आपले स्वागत आहे
आपलाच
कॉ. सुनील रोहणकर