NFPE
महाराष्ट्र संयुक्त कृति समिती
बंद बंद बंद ४८ तासांचा बंद
आपल्या (NFPE) संघटनेच्या लढवय्या वृत्तीनुसार आणि कामगारांच्या हितासाठी बलिदान देण्याच्या परंपरेनुसार पिजेसीए ने २३-११-२०१५ पासून बेमुदत संपाची हाक़ दिली होती. बऱ्याच मागण्याबद्दल प्रशासनाने दाखविलेला सकारात्मक दृष्टिकोण पाहता हा प्रस्तावित संप पुढे ढकलण्यात आला होता. परन्तु आश्वासने व सकारात्मक दृष्टिकोण यापुढे नंतर काहीच फलित नाही. प्रत्येक मागणी बाबत सरकारने घुमजाव केले व नकार घंटाच वाजवली. प्रशासनाला व सरकारला धक्का देण्यासाठी शेवटचे हत्यार म्हणून संप पुकारावा लागला. आणि चार सूत्री मागणी पत्र प्रशासनाला सादर करून दिनांक १ व २ डिसेंबर २०१५ रोजी ४८ तासांचा म्हणजे दोन दिवसांचा संप घोषित करण्यात आला.
मागण्या
१. सेवा नियम /शर्थी तसेच वेतन निर्धारण करण्यासाठी ग्रामीण डाक सेवकाना ७ व्या वेतन आयोगात समाविष्ट करणे.
२. डाक विभागातील सर्व श्रेण्यांसाठी केडर रिस्ट्रक्चरिंग
३. डाक विभागातील सगळ्या श्रेणीतील रिक्त पड़े भरणे.
४. नविन योजनांची अंमलबजावणी करताना कर्मचाऱ्यांची होणारी पिळवणूक थांबवा
लढवय्या (NFPE) संघटनेच्या बहाद्दरांना संप, त्याग, बलिदान आर्थिक नुकसान सोसने हे नविन नाही. त्यानी आत्तापर्यंत सर्व कही आंदोलने करूनच मिळविले आहे व सर्वाना त्याचा लाभ मिळवून दिलाय. पुढे देखील एनएफपीई च लढा देणार हे सर्वाना माहित आहे. तेच पुढाकार घेऊन हा संप देखील यशश्वी करण्यासाठी सज्ज झाले आहेत आणि म्हणून विजय देखील तुमचाच आहे.
वेतन आयोगाचा अहवाल सादर झाला म्हणजे लड़ाई संपलेली नाही. सर्व काही प्राप्त झाले अशा भ्रमात राहु नक. आपल्या समोर असलेले खाजगीकरणाचे धोके, पोस्टल अॅक्ट अमेंडमेंट बील, कंत्राटी पद्दत, नविन पेन्शन योजना, कामगार कायदा बदल इत्यादी आव्हाने/ धोके समोर आहेत. आपल्याला हे धोके परतवून लावण्यासाठी एकजुटीने लढ़े देण्याची गरज आहे. बिहार निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर बिहार जनतेच्या एकजुटीसारखे एकजुट होऊन सर्व शक्तिनिशी सरकारला धक्का देण्यासाठी हीच वेळ आहे. अभी नहीं तो कभी नहीं
चला एक दिलाने, एकजुटीने हा संप यशस्वी करुया.
!!!!!!एनएफपीई झिंदाबाद !!!!!!!
!!कामगार एकजुटीचा विजय असो !! !!कामगार एकता झिंदाबाद !!!!
कॉम. मंगेश परब सर्कल सचिव ए आय पी इ यु पी -३
कॉम. बाळकृष्ण चाळके सर्कल सचिव ए आय पी इ यु पी -४
कॉम. सम्राट साठे सर्कल सचिव ए आय पी इ यु आर -३
कॉम. एस एन जाधव सर्कल सचिव ए आय पी इ यु आर -४
कॉम. तावडे सर्कल सचिव ए आय पी इ यु admn