निमंत्रण
सभासद बंधू-भगिनींनो
आपणांस नम्रपूर्वक कळवित आहोत की आपल्या संघटनेचे माजी राष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि सर्कल सचिव सन्माननीय कॉ. मंगेशजी परब हे दिनांक ३१ ऑक्टोबर २०१५ रोजी टपालखात्याची ३८ वर्षे सेवा करून सेवानिवृत्त झाले.
त्यांचा हृदयस्पर्शी भव्य निरोप समारंभ व जाहीर सत्कार सोहळा कॉ. जगदीश पवार यांच्या अध्यक्षतेखाली दि. ८ नोव्हेंबर २०१५ रोजी ठीक सकाळी १०.०० वाजता अण्णासाहेब वर्तक हॉल , चितळे पथ, बी. एस. रोड , दादर (पश्चिम), मुंबई-४०० ०२८ येथे आयोजित केलेला आहे.
तरी कृपया आपण हृदयस्पर्शी भव्य निरोप समारंभ व जाहीर सत्कार सोहळ्यास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही विनंती।
आपली नम्र
सत्कार समिती