चलो दिल्ली
कॉमरेड
केंद्रीय कर्मचाऱ्यांचे ज्वलंत प्रश्न, महागाई भत्ता ५० % च्या वर गेल्या नंतर तो मूळ वेतनात समाविष्ट करणे , अंतरिम वाढ देणे, सातवा वेतन आयोग १-१-२०१४ पासून लागु करणे यावर सरकारने नकार घंटा वाजविण्यास सुरवात केलि आहे.तसेच जीडीएस कर्मचाऱ्यांच्या वेतन आयोगाचे भिजत घोंगडे तसेच पडून आहे। या प्रश्नांकडे लक्ष देण्यासाठी एनएफपीई व एफएनपीओ या संघटनांनी दी ४-१२-२०१४ रोजी संसदेवर भव्य मोर्चा न्यावयाचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातून सर्व संघटनांचे मिळून ४०० कार्यकर्ते या मोर्च्यात सहभागी व्हावेत अशी केंद्रीय शाखेची इच्छा आहे. तरी सर्व विभागीय शाखानी त्याप्रमाणे तयारी करावी
४-१२-२०१४ रोजी मोठ्या संख्येने दिल्ली मोर्च्यात सामिल व्हा