WELCOME TO OFFICIAL WEBSITE OF AIPEU GROUP 'C' MAHARASHTRA CIRCLE

Monday 23 November 2015

कॉमरेड

     आपणास ऐसी विनंती करण्यात येत आहे की जे सर्कुलर प्रसिद्ध केले आहे ते आपण सर्वाणि  तयार  करून  आपापल्या विभागात प्रसिद्ध करणे  कारण नेल कमी आहे. जेसीएम  छे पत्रक येई पर्यट वाट पाहू नका.



NFPE

महाराष्ट्र संयुक्त कृति समिती 
बंद बंद बंद ४८ तासांचा बंद 
           आपल्या (NFPE) संघटनेच्या लढवय्या वृत्तीनुसार आणि कामगारांच्या हितासाठी बलिदान देण्याच्या परंपरेनुसार पिजेसीए ने २३-११-२०१५ पासून बेमुदत संपाची हाक़ दिली होती. बऱ्याच मागण्याबद्दल प्रशासनाने दाखविलेला सकारात्मक दृष्टिकोण पाहता हा प्रस्तावित संप पुढे ढकलण्यात आला होता. परन्तु आश्वासने व सकारात्मक दृष्टिकोण  यापुढे नंतर काहीच फलित नाही. प्रत्येक मागणी बाबत सरकारने घुमजाव केले व नकार घंटाच  वाजवली. प्रशासनाला व सरकारला धक्का देण्यासाठी शेवटचे हत्यार म्हणून संप पुकारावा लागला. आणि चार सूत्री मागणी पत्र प्रशासनाला सादर करून  दिनांक १ व २ डिसेंबर २०१५ रोजी ४८ तासांचा म्हणजे दोन दिवसांचा संप घोषित करण्यात आला. 
मागण्या 
१. सेवा नियम /शर्थी तसेच वेतन निर्धारण करण्यासाठी ग्रामीण डाक सेवकाना ७ व्या वेतन आयोगात                   समाविष्ट करणे. 
२. डाक विभागातील सर्व श्रेण्यांसाठी केडर रिस्ट्रक्चरिंग 
३. डाक विभागातील सगळ्या श्रेणीतील रिक्त पड़े भरणे. 
४. नविन योजनांची अंमलबजावणी करताना कर्मचाऱ्यांची होणारी पिळवणूक थांबवा 

         लढवय्या (NFPE) संघटनेच्या बहाद्दरांना संप, त्याग, बलिदान आर्थिक नुकसान सोसने हे नविन नाही. त्यानी आत्तापर्यंत सर्व कही आंदोलने करूनच मिळविले आहे व सर्वाना त्याचा लाभ मिळवून दिलाय. पुढे देखील एनएफपीई च लढा देणार हे सर्वाना माहित आहे. तेच पुढाकार घेऊन हा संप देखील यशश्वी करण्यासाठी सज्ज झाले आहेत आणि म्हणून विजय देखील तुमचाच आहे. 
          
        वेतन आयोगाचा अहवाल सादर झाला म्हणजे लड़ाई संपलेली नाही. सर्व काही प्राप्त झाले अशा भ्रमात राहु नक. आपल्या समोर असलेले खाजगीकरणाचे धोके, पोस्टल अॅक्ट अमेंडमेंट बील, कंत्राटी पद्दत, नविन पेन्शन योजना, कामगार कायदा बदल इत्यादी आव्हाने/ धोके समोर आहेत. आपल्याला हे धोके परतवून लावण्यासाठी एकजुटीने लढ़े देण्याची गरज आहे. बिहार निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर बिहार जनतेच्या एकजुटीसारखे एकजुट होऊन  सर्व शक्तिनिशी सरकारला धक्का देण्यासाठी हीच वेळ आहे. अभी नहीं तो कभी नहीं  

       चला एक दिलाने, एकजुटीने हा संप यशस्वी करुया. 

 !!!!!!एनएफपीई झिंदाबाद !!!!!!!  
!!कामगार एकजुटीचा विजय असो !!       !!कामगार एकता झिंदाबाद !!!!

 कॉम.  मंगेश परब                सर्कल सचिव  ए आय पी इ यु  पी -३ 
 कॉम.  बाळकृष्ण चाळके      सर्कल सचिव  ए आय पी इ यु  पी -४ 
 कॉम.  सम्राट साठे               सर्कल सचिव  ए आय पी इ यु  आर -३ 
 कॉम.   एस एन जाधव         सर्कल सचिव  ए आय पी इ यु  आर -४ 
 कॉम.   तावडे                     सर्कल सचिव  ए आय पी इ यु  admn             
                                                         


      





Saturday 21 November 2015

कॉमरेड सभासद बंधू-भगिनी
                                         आपणास महितीच आहे की दि १९-११-२०१५ रोजी ७ व्या पे कमीशने आपला रिपोर्ट सरकारला सादर केला. त्यामध्ये आपल्याला हवी तशी वाढ दिलेली नाही. त्यामुळे सरकारवर दबाव आणण्यासाठी दि. २७-११-२०१५ रोजी काळादिन म्हणून पाळावयाचा आहे. त्यामुळे त्यादिवशी काळ्याफीती लावून निषेध नोंदवायचा आहे. तरी आपण सर्वानी त्या दिवशी काळ्याफीती लावून सरकारचा निषेध करावा.सर्वच सरकारी कर्मचारी काळ्याफीती लावून सरकारचा निषेध करणार आहेत.
7th  PAY COMMISSION REPORT

TOTALLY DISAPPOINTING
POSTAL EMPLOYEES – ALL DEMANDS REGARDING ENHANCED WAGES AND SERVICE CONDITIONS REJECTED
 

HOLD PROTEST DEMONSTRATIONS ALL OVER THE COUNTRY
 

1.     Commission is of the view that there is no justification of upgrading the pay of
(a)  Postal Assistants/Sorting Assistants
(b) Postal Assistant (SBCO)
(c)  Postal Assistant (CO)
(d) Postman cadre & Mailguard.
(e)  PO & RMS accountants
(f)   Despatch Rider (MMS)
(g)  Multi-Tasking Staff (MTS) including Foreign Post
(h) Binders
(i)    System Administrators (No separate cadre or pay)
(j)    Marketing Executives (no separate cadre or Pay)
(k)  Artisans
(l)    Technical Supervisors (MMS) (in) Drivers

2.     Gramin Dak Sevaks cannot be treated as Civil servants at par with Regular employees. As they are only holder of civil posts and not civilian employees, no recommendations with regard to GDS.

3.     Recommended immediate merger of 33 Postal dispensaries in 10 Postal Circles with CGHS.
  
4.     ADDITIONAL POST ALLOWANCE FOR POSTMAN
10% of Basic Pay if one shares the another Postmen duty. If it is shared by two Postmen, it will be 5% for both.

5.     HOLIDAY MONETARY COMPENSATION
Supervisor, PA, Sorting Postman – Rs. 200/- per holiday.
MTS – Rs. 150/- per holiday

6.     ADDITIONAL WORK ALLOWANCE
2% of the Basic Pay per month
10% of the Basic pay if period exceeds 45 days.

7.     IP/ASP/SP SCALE UPGRADED
Commission has noted that the VI CPC had placed Inspector (Posts) at par with Inspector of CBDT/CBED. Subsequently the Inspector of CBDT/CBE were elevated to GP 4600. The Commission has further noted that the Inspector of Posts and Inspector of CBDT/CBED are recruited through the same combined graduate level examination. Therefore the commission recommended 4600 GP for IP and 4800 GP and 5400 GP for SPOs.


(R. N. Parashar)
Secretary General
NFPE







Thursday 5 November 2015

निमंत्रण 
सभासद बंधू-भगिनींनो 
                                  आपणांस नम्रपूर्वक कळवित  आहोत की आपल्या संघटनेचे माजी राष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि सर्कल सचिव सन्माननीय कॉ. मंगेशजी परब हे दिनांक ३१ ऑक्टोबर २०१५ रोजी टपालखात्याची ३८ वर्षे सेवा करून  सेवानिवृत्त झाले. 
                                  त्यांचा हृदयस्पर्शी भव्य निरोप समारंभ व जाहीर  सत्कार सोहळा कॉ. जगदीश पवार यांच्या अध्यक्षतेखाली दि. ८ नोव्हेंबर २०१५ रोजी ठीक सकाळी १०.०० वाजता  अण्णासाहेब वर्तक हॉल , चितळे पथ, बी. एस.  रोड , दादर (पश्चिम), मुंबई-४०० ०२८  येथे आयोजित केलेला आहे. 
                                 तरी कृपया आपण हृदयस्पर्शी भव्य निरोप समारंभ व जाहीर  सत्कार सोहळ्यास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही विनंती।

                                                                                                                   आपली नम्र
                                                                                                                 सत्कार समिती